शिपिंग व डिलिव्हरी धोरण
आमचे स्वतःचे वाहन
रोपे, कुंड्या, माती व खत आम्ही स्वतःच्या वाहनातून सुरक्षित पॅकिंगसह पोहोचवतो – कुरियर नाही.
डिलिव्हरी क्षेत्र
कराड व सातारा (415 ने सुरू होणारे पिनकोड): तुम्ही निवडलेल्या तारखेला व सकाळ/संध्याकाळच्या वेळेत आमच्या वाहनातून. उर्वरित महाराष्ट्र (गोवा 403 वगळून): कुरियरने साधारण ३–६ कामकाजाचे दिवस (अचूक अंदाज चेकआउटवेळी). महाराष्ट्राबाहेर सध्या डिलिव्हरी नाही. काही मोठ्या वस्तू (उदा. लॉन गवत, केळी रोपे, मोठी रोपे, सिमेंट कुंड्या, २५ किलो पिशव्या) फक्त स्थानिक डिलिव्हरी किंवा नर्सरी पिकअप.
कुरियर शुल्क व COD
कुरियर: ₹९९९ व त्यापेक्षा जास्त ऑर्डरवर मोफत, ₹९९९ पेक्षा कमी असल्यास ₹९९. ₹२,००० पर्यंतच्या ऑर्डरसाठी संपूर्ण महाराष्ट्रात कॅश ऑन डिलिव्हरी; कुरियर COD ऑर्डरवर ₹४९ COD शुल्क व WhatsApp वर कन्फर्मेशन आवश्यक.
डिलिव्हरीचे दिवस
सोमवार ते शनिवार, सकाळ किंवा संध्याकाळची वेळ – चेकआउटवेळी पुढील ७ कामकाजाच्या दिवसांमधून निवडा.
डिलिव्हरी शुल्क
₹४९९ व त्यापेक्षा जास्त ऑर्डरवर मोफत डिलिव्हरी; ₹४९९ पेक्षा कमी ऑर्डरसाठी ₹४९.
नर्सरी पिकअप
राजमाची नर्सरी (ता. कराड, जि. सातारा) येथून पिकअप नेहमी मोफत. काही मोठ्या वस्तू फक्त पिकअपसाठी.
