नियम व अटी

सेवा

PastureGreen बाग सेवा, सल्ला व लँडस्केप कामे पाश्चर रेज्ड फार्म प्रा. लि., कराड यांच्याकडून दिली जातात. ऑनलाइन दर GST सह आहेत. अंतिम प्रमाण जागेवर तपासले जाते.

बुकिंग व पेमेंट

ऑनलाइन बुकिंग शुल्क मिळाल्यावरच बुकिंग पक्के होते. उर्वरित रक्कम काम झाल्यावर जागेवर (रोख/UPI) द्यायची. फोन/व्हिडिओ सल्ल्याची पूर्ण रक्कम ऑनलाइन भरायची.

जागेवर प्रवेश

बुक केलेल्या वेळी बाग, पाणी व (आवश्यक असल्यास) वीज उपलब्ध ठेवा. टीमला प्रवेश न मिळाल्यास बुकिंग शुल्क परत मिळणार नाही.

रोपे व परिणाम

पुरवठ्याच्या वेळी रोपे निरोगी असतात. नंतर रोपे टिकणे काळजी, हवामान व पाणी यावर अवलंबून असते; आम्ही काळजीबाबत मार्गदर्शन करू.